“भडगाव न्यायालय आवारात नोटरी फी- आकारणी फलक लावून प्रसिद्धीची मागणी
गोंडगाव ता. भडगाव (सतीश पाटील) भडगाव मे ज्युडी – मेजिस्टेट कोर्टात च्या आवारात नोटरी फी – आकारणी संदर्भात- माहिती फलक लावण्याची व प्रसिद्धीची मागणी भडगाव येथील तालुका न्यायालयात अर्ज दाखल करुन विजय दोधा पाटील यांनी केली आहे. भडगाव येथील नोटरी परवानाधारक ॲड हेमंत कुलकर्णी यांनी मागीलवर्षी सैनिक भरती विद्यार्थी ची भरमसाठ १५/२० पटीने लुट केल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्या संदर्भात विजय पाटील हे सम्पुर्ण जळगांव जिल्हाभर “जन आंदोलन व जनजागृती” शासन नियमाप्रमाणे नोटरी फी आकारणी घेण्यासाठी प्रसिद्धी व फी संदर्भात माहीती फलक लावण्याची मागणी जिल्हा सत्र न्यायालय जळगाव व जिल्हाधिकारी कार्यालय तालुका न्यायालयात व तहसील कार्यालय येथील सर्व कार्यालयात -नोटरी फी आकारणी संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या परीपत्रक नियम तरतुदींची अंमलबजावणी करणेची मागणी केली आहे. व करीत आहेत. संबंधित शासन आदेशानुसार नोटरी फी आकारणी फलक लावण्याची व प्रशीध्दी न केल्यास व अवलोकन न झाल्यास उच्च न्यायालय खंडपीठ. औरंगाबाद येथे जनहीत याचिका विजय दोधा पाटील हे दाखल करणार आहेत. तसेच नोटरी माध्यमातून अवैध १५ते२०पटीने जादा लुट करणारे भडगाव येथील अँड हेमंत कुलकर्णी यांची नोटरी परवाना सदर्भीत विधी व न्याय विभागाकडे महाराष्ट्र राज्य शासनाकडे कुठलीही नोंद नसल्याने आढळून आले आहे. तसे केंद्र सरकारकडे चौकशीला हेमंत कुलकर्णी याचा परवाना रद्दबातल करण्याची मागणी विधि व न्याय विभाग मुंबई महाराष्ट्र शासन मार्फत केली आहे.



