छोट्याशा लोणवाडी गावातील गरीब घराण्यातील मुलगा बनणार गायक.
दिनांक :- ३१ जुलै २०२२
प्रतिनिधि- सतीश बावस्कर
बोदवड: श्रीमती सी. एस. महाजन माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचा बारावी कला शाखेचा विद्यार्थी किरण सुरेश गोफणे याची इंडियन आयडॉल सीजन १३ साठी पहिल्या फेरीत निवड झालेली आहे. किरण गोफणे हा गरिब घरण्यातील आहे . त्याचे आई वडील मोल मजुरी करून त्याचे शिक्षण करत आहेत बोदवड तालुक्यातील लोणवाडी सारख्या छोट्याशा खेड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी असून त्याला गायनाचे अंग आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील व राज्याबाहेरील सहा हजार मुले व दोन हजार मुली यांच्यामधून ज्या तीन गायकांची निवड झाली त्या तीन मध्ये जामठी विद्यालयाचा विद्यार्थी किरण गोफणे याचा समावेश आहे. किरण गोफणे याचा एज्युकेशन सोसायटी जामठीचे उपाध्यक्ष श्री अंबादास भाऊ चौधरी यांच्या हस्ते विद्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक भाऊ सत्रे, सचिव श्री भगवान भाऊ महाजन, संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री आप्पासाहेब संभाजी पाटील उपस्थित होते. संपूर्ण परिसरातून व विद्यालयातर्फे किरण गोफणे याचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले, तसेच त्याला सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन परिसरातून होत आहे.