फुकट श्रेय घेणा-यांना जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर आबा भामरे यांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर
जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर आबा भामरे कर्ले येथे पाझर तलाव दुरूस्तीस प्रांरभ
दोंडाईचा (गोपाल कोळी) मेथी जिल्हा परिषद गटातील गावांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील आहे. फुकटच्या कामाचे श्रेय घेणा-या प्रवृत्तीला आता चोख उत्तर दिले जाईल जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाकडून बाटल्या नाल्यावरील जुन्या पाझर तलावांच्या दुरूस्ती साठी पाप्त ३३ लाख रुपयांच्या निधीतून कर्ले या.शिंदखेडा येथे रविवारी कामाच्या प्रारंभ करतांना ज्ञानेश्वर आबा भामरे बोलत होते.
नंदु चव्हाण पंचायत समिती सदस्य, अधिकार देवरे सरपंच, कर्ले रामचंद्र पाटील, निंबा दाजी ठाकरे, शरद देवरे, नथ्थु पाटील, शांताराम देवरे, किशोर देवरे, कल्याण बोरसे व ग्रामस्थ उपस्थित होते. या तलावात ९२ टीसीएम जलसाठा साठणार असल्याने तलावांच्या खालील भागातील शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. या वेळी शिंदखेडा पंचायत समिती लघु सिंचन विभागाचे शाखा अभियंता हर्षल पाटील यांनी पाझर तलावाच्या कामासाठी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर आबा भामरे यांच्या पाठपुरावा असल्याने काम मंजूर करून घेतले आहे. प्रगतशील शेतकरी निंबा दाजी ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.