शिंदखेडा येथील नगरपंचायतमार्फत जागतिक दिव्यांग दिनी लाभार्थ्यांना धनादेश व वृक्ष रोपांचे वाटप
शिंदखेडा (प्रतिनिधी) येथील नगरपंचायत च्यावतीने घेण्यात आलेल्या जागतिक दिव्यांग दिनी शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सदर कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात १६३ लाभार्थ्यांना ३ लाख २६ हजार चा धनादेश प्रत्येकी दोन हजार प्रमाणे प्रदान करण्यात आला. तसेच प्रत्येकी एक दिव्यांगना वृक्ष वाटप करण्यात आले.
यावेळी तहसीलदार सुनील सैदाने, नगराध्यक्ष रजनी वानखेडे, उपनगराध्यक्ष भिला पाटील, पी एस आय गजानन गोटे, गटनेते अनिल वानखेडे सुनील चौधरी, नगरसेवक दीपक अहिरे, उदय देसले, विनोद पाटील, चेतन परमार यासह दिव्यांग समितीचे अमोल शिंपी, महेंद्र मराठे तर नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, दिनेश फुलपगारे, प्रल्हाद देवरे यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जवळपास १६३ लाभार्थ्यांना ३ लाख २६ हजार चा धनादेश प्रत्येकी दोन हजार प्रमाणे प्रदान करण्यात आला. तसेच प्रत्येकी एक दिव्यांगना वृक्ष वाटप करण्यात आले. तसेच दिनेश फुलपगारे यानी दिव्याग व्यक्तीच्या शासकीय योजनांची माहिती दिली त्याचा लाभ घ्यावा. तर तहसीलदार सुनील सैदाने यांनी अंतोदय योजनाची माहिती दिली व लाभ घेण्याचे आवाहन केले. पी एस आय गजानन गोटे यांनी कायदे कानुन विषयी माहिती दिली. यावेळी हरित क्रांती शपथ घेतली. कार्यक्रमाचे नियोजन प्रल्हाद देवरे यांनी केले. यावेळी नगरपंचायतचे दिनेश फुलपगारे, प्रल्हाद देवरे, विवेक डांगरीकर आदीसह कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



