नगरसेवक अँड. गजेंद्र भोसलेंवरील आरोपाची चौकशी करावी ; साक्री तालुका वकील संघाचे तहसीलदारांना निवेदन
साक्री (प्रतिनिधी) साक्री पोलिस स्टेशनमधील आरोपलेले गजेंद्र रामराव भोसले अॅडव्होकेट, साक्री जिल्हा धुळे यांचे बाबतचा तपास एवं चौकशी नि:पक्षपातीपणे करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन साक्री तालुका वकील संघ सदस्यांनी नायब तहसीलदार यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, साक्री येथील नगर पंचायतची सार्वत्रिक निवडणुक २०२१ नुकतीच निवडणुक पार पडली असुन सदर निवडणुकीत साक्री तालुका वकील संघाचे विद्यमान सदस्य गजेंद्र रामराव भोसले हे निवडून आले आहेत. राजकीय षडःयंत्रामुळे साक्री शहरात वरील तथाकथीत गुन्ह्यात भोसले यांचे नाव राजकीय द्वेषापोटी नाहकपणे गोवण्यात आले आहे. त्यांचा वरील गुन्ह्याशी काडीमात्र संबंध किंवा सहभाग नव्हता व परिस्थितीत नाही. वरील गुन्ह्याचा तपास निःपक्षपातीपणे होणे अत्यावश्यक व गरजेचे आहे. त्यासाठी सदर निवेदन आपणाकडेस सविनय सादर करीत आहोत. अशा गुन्ह्याचा तपास तरी वरील वस्तुस्थितीचा विचार होऊन वरील गुन्ह्याचा निःपक्षपाती तपास होऊन वकील संघाचे सदस्य गजेंद्र भोसले यांना न्याय मिळावा, अशी मागणी यात केली आहे.
निवेदनावर ऍड यु.व्ही मराठे, एम झेड देवरे, आर बी सूर्यवंशी, अँड. पुनम काकुस्ते- शिंदे, रूपाली मोहिते, अँड. प्रकाश देवरे, अँड. बादल साळुंके, अँड. अनिल वळवी, अँड. आर.ए. पाटील, अँड. दिनेश कोळी, अँड. निलेश चौधरी, अँड. सुनील नांद्रे, नरेंद्र मराठे, एच.ओ. सोनार, संग्राम भोसले, मनोज खैरनार, अतुल जाधव आदींसह वकील संघाच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.