तामिळनाडूत विद्यार्थिनीने दबावापोटी आत्महत्या केल्याचा अभाविपचा आरोप
धुळे (स्वप्नील मराठे) तामिळनाडूतील एका खिश्चन मिशनरींच्या शिक्षण संस्थेतील लावण्या या विद्यार्थिनीवर धर्मातर करण्याबाबत दबाव टाकण्यात येत होता. या दबावातून लावण्याने आत्महत्या केली असा आरोप करत या घटनेचा निषेध आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील शिवतिर्थ चौकात निषेध आंदोलन केले. तामिळनाडूतील एका ख्रिश्चन मिशनरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या लावण्या या विद्यार्थीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करावे यासाठी दबाव टाकण्यात येत होता. या दबावातून लावण्याला आत्महत्या करावी लागली, असा आरोप होत आहे. ही संस्थात्मक हत्या भारतीय संविधान आणि लोकशाहीला काळीमा फासणारी असून अशा धार्मिक उन्मादामुळे असंख्य निष्पापांना आपले प्राण गमवावे लागत आहे. परंतु अद्यापही तेथील सरकारने अपराध्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. आंदोलन करताना विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त
आत्महत्या करण्यास भाग पाडलेल्या लावण्याला न्याय मिळावा यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी उपस्थित होते.