शिरपूर कॉंग्रेस सेवादलाच्या उपाध्यक्षपदी दिलीप शिवाजी पाटील तर यंग ब्रिगडे उपाध्यक्षपदी संदीप (नरेश) पावरा यांची निवड
शिरपूर (ॠषिकेश शिंपी) शिरपूर शहर व शिरपूर तालुका कॉग्रेस सेवादलाच्या वतीने कॉग्रेस भवन शिरपूर येथे शिव छत्रपती शिवरायांची जयंती निमीताने मान्यवर उपस्थित होते. यांच्यावतीने शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतीमा पुजन केले व प्रतीमा पुजनाने साजरी करण्यात येऊन शिरपूर तालुक्यात कॉग्रेस सेवादलाची ताकद वाढण्यासाठी शिरपूर तालुका काँग्रेस सेवादालाच्या उपाध्याक्षपदी ताजपुरी येथील. दिलीप पाटील (कापडणेकर) व शिरपूर तालुका काँग्रेस सेवादालाच्या यंग ब्रिगेड तालुका उपाध्यक्षपदी लाकळ्या हनुमान येथील तरुण तडकदार युवा नेतृत्व संदिप (नरेश) पावरा यांची निवड करण्यात आली.
शिरपूर शहर व तालुका काँग्रेस कमीटी व कॉंग्रेस सेवादलाच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी कॉग्रेस भवन शिरपूर येथे शिवरायांच्या प्रतीमेचे पुजन करुन शिवजयंती साजरी करण्यात आली. व्हि. यु. पाटील, उत्तमराव माळी, अभिमन भोई (पहेलवान) कॉग्रेस सेवादालाच्या तालुका अध्यक्ष योगेश जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करून त्यांच्या हमो व मान्यवरांच्या हस्ते शिरपूर तालुका काँग्रेस सेवादालाच्या उपाध्यक्षपदी ताजपुरी येथील दिलीप शिवाजी पाटील (कापडणेकर) यांची तर कॉंग्रेस सेवादलाच्या यंग ब्रिगडे तालुका उपाध्यपदी लाकळ्या हनुमान येथील संदीप (नरेश) शिवाजी पावरा यांना नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
यावेळी अजय पाटील, अभिमन भोई, मोहन पाटील, नानासो व्हि.यु. पाटील, उत्तमराव माळी, राजेद्र अग्रवाल, विजय तिवारी, प्रा प्रदिप पवार, अॅड प्रितम गिरासे, सुभाव लोहार, ऋषिकेश शिंपी, लाकड्या हनुमान येथील दिनेश पावरा, आनदसिंग पावरा, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्तित होते.