वैजापूर पोलीस स्टेशनचे कर्तबगार पोलीस बालाजी वैद्य व मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन.
दिनांक – १० आँगस्ट २०२२
वैजापुर प्रतिनिधि- गहनीनाथ वाघ
वैजापूर तालुक्यातील लासुरगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आज दिनांक १० आँगस्ट रोजी साडेदहा ते साडेबारा वाजता स्टुडन्ट पोलीस कॅंडिडेट प्रोग्राम अंतर्गत वैजापूर पोलीस स्टेशन येथे घेतले.
पोलीस स्टेशनचा कारभार कसा प्रकारे चालवला जातो याची माहिती इयत्ता नववीच्या २९ विद्यार्थिनी,२१ विद्यार्थी असे ५० विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनला दिली भेट भेटीसाठी विद्यार्थी गेले असता पोलीस स्टेशनचे प्रभारी बालाजी वैद्य पीएसआय मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालवले जाते कशाप्रकारे हत्यार वापरले जाते कैदी कसे पकडावेत व त्यांच्याकडून चोरी कशी उघडकीस आणावीत व त्यांची जेलमध्ये कशाप्रकारे व्यवस्था ठेवली जाते अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना समजावून सांगितलेल्या व वेळोकाळी आपली सुरक्षा कशी करावी हेही सांगितले विद्यार्थ्यांनीही त्यांच्या मार्गदर्शनाची माहिती घेत त्यांना सांगितले की आम्हीही तुमच्यासारखे कर्तबगार व प्रामाणिक पोलीस बनण्याचा प्रयत्न करू तुम्ही दिलेल्या माहिती आमच्यासाठी प्रेरणादायी असेल असे विद्यार्थी म्हणाले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप विसपुते शिक्षक संभाजी धोंगडे शंकर खैरनार हे होते.