महाराष्ट्र
कारच्या भीषण अपघातात शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटें यांचे निधन.
दिनांक- १४ आँगस्ट
खोपोली – प्रतिनिधि
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ शिवसंग्राम पक्षाचे नेते, आमदार विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मेटे यांना मुंबईला हलविण्याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. मात्र, डॉक्टरांनी त्यांना निधन झाल्याची कल्पना दिली. डॉ. धर्मांग यांनी मेटे यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी त्यांनी मोठा लढा उभारला होता. असा नेता आज पडदा आळ गेल्याने मोठी हानी झाली आहे. यामुळे मोठी शोककळा पसरली आहे.