गझलसम्राट सुरेश भटांमुळे मराठीत गझल रूजली
मंगळवेढा : काव्यप्रेमी शिक्षक मंच व शब्द सुमने मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गझलकार स्व. सुरेश भट यांच्या जयंती निमित्त मंगळवेढा येथील नगर वाचनालयाच्या करमरकर सभागृहात मोठ्या उत्साहात गझल मुशायरा संपन्न झाला.
सदर गझल मुशायराच्या उद्घाटनप्रसंगी सुप्रसिद्ध गझलकार कालिदास चवडेकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. नंदकुमार पवार, काव्यप्रेमी शिक्षक मंचचे संस्थापक अध्यक्ष आनंद घोडके, शब्दसुमने मंचचे संस्थापक अध्यक्ष हेमंत रत्नपारखी, पुण्याचे ज्येष्ठ गझलकार बबन धुमाळ, पंढरपुरचे ज्येष्ठ गझलकार वैभव कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री सरस्वती माता व गझलसम्राट सुरेश भट यांच्या प्रतिमांचे पूजन करून तसेच दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. हेमंत रत्नपारखी यांनी आपल्या प्रस्तावनेत मराठी गझल व गझलेचे तंत्र याबाबत माहिती देतानाच सुरेश भटांमुळे गझल मराठीत कशी रूजली व रूळली हे ही सांगितले.
उद्घाटनानंतर मंगळवेढा येथील विद्या माने, विजय खाडे, हेमंत रत्नपासखी, चंद्रकांत चौगुले बार्शी येथील युवराज जगताप, जीवन धेंडे अक्कलकोट येथील निलोफर फणीबंद, सोलापूर येथील खाजाभाई बागवान, माढा येथील आप्पा वाघमारे करमाळा येथील नवनाथ खरात, इत्यादी गझलकरांनी आपल्या बहारदार गझलांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. गझलेच्या शेवटच्या अतिथीय सत्रात कालिदास चवडेकर, वैभव कुलकर्णी, बबन धुमाळ व प्रा .अकबर मुलाणी यांनी रसिकांना गझलियत काय असते हे आपल्या गझल सादरीकरणातून दाखवून दिले. सदर कार्यक्रमातील वेगवेगळ्या सत्रांचे सूत्रसंचालन नवनाथ खरात, विजय खाडे यांनी केले तर आभार हरिप्रसाद देवकर यांनी मानले. सदर कार्यक्रमात डॉ. लक्ष्मण हेंबाडे , संतोष रायबान, धनंजय माने सुकदेव जाधव, विनायक मंगसुळे, कैलास क्षिरसागर, प्रकाश माने , विशाल माने, स्वप्निल महामुनी, मंगल बनसोडे , डॉ.आरती खरात, डॉ.आकांक्षा खरात, रत्नमाला खरात, रोहिणी शिन्दे ,नंदकुमार काळे आदी ४० काव्यरसिक उपस्पित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काव्यप्रेमी शिक्षक मंच व शब्दसुमने मंच मंगळवेढा या शाखेच्या सभासदांनी व नगर वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.



