देशाच्या संरक्षण क्षेत्रात महिला मागे नाहीत : प्रा.डाॅ.तुषार पाटील
शिंदखेड़ा येथे भारतीय जैन संघटनेच्या वतीने युवती कार्यशाळेचे उदघाटन
शिंदखेडा (यादवराव सावंत) देशाच्या संरक्षण क्षेत्रातही महिला मागे नाहीत. प्रगत विज्ञान समाज निर्मितीसाठी महिलांनी योगदान दिले आहे. त्यामुळे स्री पुरुष यांच्यात भेदभाव करता येणार नाही. असे प्रतिपादन एसएसव्हीपीएस प्राचार्य डॉ.तुषार पाटील यांनी केले. ते भारतीय जैन संघटना व एस एस व्ही पी एस महाविद्यालय शिंदखेड़ा व युवती सभातर्फे आयोजित युवतींचे सक्षमीकरण “स्मार्ट गर्ल्स टू बी हैप्पी टू बी स्ट्रांग या कार्यशाळेचे उद्धघाटन प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे स्थानिक कार्यकारिणी उपाध्यक्ष अशोक पाटील होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला द्वीप प्रज्वलन व क्रांतीजोती सावित्री फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशिक्षिका सुवर्णा कटारे यांच्या हस्ते करण्या करण्यात आले. व्यासपीठावर भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष हरकचंद बोरा, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. चंद्रकांत डागा, शिंदखेड़ा शहर अध्यक्ष भागचंद कर्णावट, सचिव हितेंद्र जैन, अशोक राखेचा, सुरेश गिडीया, सुमीत जैन, संजय पारख, अक्षय बाफना, कल्पेश कर्णावट, उप प्राचार्य डॉ. बी. ऐ. पाटील, युवती सभा प्रमुख डॉ. आशा कांबळे, महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. एस. टी. राऊळ, कार्यालयीन अधीक्षक नरेंद्र भामरे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. तुषार पाटील पुढे म्हणाले, धकाधकिच्या या जीवनात स्रीयांचे स्वताच्या आरोग्याकड़े दुर्लक्ष करतांना दिसतात. शैक्षणिक व आर्थिक. प्रगती साधतांना स्रियांनी शाररिक सढृडतेकडे भर दिला पाहिजे. शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात महिलांचे योगदान तुल्यबळाचे आहे. मात्र आजही महिलांवर अत्याचाराचे प्रमाण कमी झालेले नाही. भारतीय जैन संघटनेने घेतलेला हा उपक्रम उपयुक्त आहे.
सुवर्णा कटारे यांनी, मुलींनी प्रतिकूल परिस्थितिशी सामना करत आत्मविश्वास बाळगावा तसेच जीवनात नेहमी सकारात्मक विचार ठेवून पुढे वाटचाल करण्यासंबधी मार्गदर्शन केले. राज्य उपाध्यक्ष हरकचूद बोस यांनी भारतीय जैन संघटनेच्या सुरू असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. प्रशिक्षणाला 73 युवती उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्तविक डाॅ.आशा कांबळे सुत्रसंचलन प्रा.वंदना पाटील तर आभार प्रदर्शन प्रा.जयश्री देवरे यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक , शिक्षकेतर उपस्थित होते.