पोलिस अधिकाऱ्यांकडून पत्रकाराला मारहाणी घटनेच्या शहर पत्रकार संस्थेतर्फे जाहिर निषेध
भुसावळ (प्रतिनिधी) येथे दि. २६ फेब्रुवारी रोजी खडका रोड वरील अतिक्रमण काढण्यात येत असलेल्या दरम्यान झालेले वादाचे वृत्तपत्राचे फोटोग्राफर व वृत्त संकलनसाठी व्हिडिओ काढत असताना पत्रकार व फोटोग्राफर यांना पोलिसांकडून हटविण्यात आले. याच दरम्यान एका पत्रकाराला मारहाण करण्यात आली याच्या निषेधार्थ पोलीस अधिकाऱ्यांचा भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे निषेध नोंदविण्यात येत आहे.
यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून निवेदन देण्यात येणार आहे. नुकतेच रुजू झालेले अधिकारी यांची कोणतीही पूर्वसूचना न देता पत्रकारांवर दबंग गिरीही होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे नेहमी पोलिस प्रशासनाला पत्रकार फोटोग्राफर व न्यूज चैनल च्या प्रतिनिधी यांची साथ असते एखाद्या घडलेल्या घटने दरम्यान अधिकारी व पोलिसांनी पत्रकार व फोटोग्राफर यांच्याशी समजूतदारपणे वागावे हीच अपेक्षा. पोलिसांना नेहमीच फोटोग्राफर व्हिडिओ शूट करणारे पत्रकार आणि वृत्त वृत्तपत्र संकलन पत्रकारांची नेहमी साथ असते अशा स्थितीत अधिकारी व पोलिसांनी अशी वर्तणूक केल्यास यापुढे ही दबंगगिरी खपून घेतली जाणार नाही असे आवाहन पत्रकार संघटनेतर्फे करण्यात येत आहे. यापूर्वीही नूतन रुजू झालेल्या अधिकारी व पोलिसांकडून फोटोग्राफर, न्युज व्हिडिओ शूट करणाऱ्या पत्रकारां ना समजून नसांगता दमदाटी केली आहे. भुसावळ शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव तसेच पदाधिकारी सदस्य सर्व पत्र पत्रकार छायाचित्रकार न्यूज चैनल पत्रकारानंतर्फे झालेल्या घटनेचा जाहिर निषेध नोंदविण्यात येत आहे.