वाहकाला आला हृदयविकाराच्या झटका ; दुसऱ्या दिवशी उपचारावेळी प्राणज्योत मालवली
चोपडा (विश्वास वाडे) चोपडा आगारातील वाहक राजाराम खंडू वाणी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांना एसटी महामंडळाने नुकसान भरपाई ची नोटीस बजावली होती. त्यांच्या मृत्यूला एसटी महामंडळाचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप संपकरी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
दि. ५ जानेवारी रोजी आगार व्यवस्थापक चोपडा यांनी कारणे दाखवा नोटीस वाहक राजाराम खंडू वाणी यांना शिस्त व आवेदन कार्यपद्धती अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. सदर नोटीस मध्ये आपण दिर्घ कालावधीपासून कर्तव्यावर गैरहजर आहात. त्यामुळे महामंडळाच्या कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले आहे तसेच प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे जनसामान्यात महामंडळा विषयी रोष निर्माण झाला आहे.
महामंडळाची प्रतिमा मलिन होत आहे तरी आपण कर्तव्यावर हजर राहावे, हजर न राहिल्यास राज्य परिवहन महामंडळ शिस्त व आवेदन कार्यपद्धती नुसार आपणावर अपराध कारवाई का करण्यात येऊ नये ? अशा प्रकारची नोटीस राजाराम खंडू वाणी वाहक यांना बजावण्यात आली होती.
सदर नोटीसचा धक्क्याने वाहक राजाराम खंडू वाणी यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. व यास सर्वस्व जबाबदार राज्य परिवहन महामंडळ प्रशासन असल्याचा आरोप संपकरी कर्मचाऱ्यांनी केला आहे.