दिनांक:-०१ सप्टेंबर २०२२
वैजापुर- प्रतिनिधि- गहहनीनाथ वाघ
“आई-बाबा” म्हटलं कि डोळ्यासमोर येतो तो वात्सल्याचा झरा… आपल्यालं हवं नको ते पाहण्यासाठी सातत्याने धडपडणारी एक व्यक्ती.मात्र काही काळानुशंगाने हे भाग्य हरपविले जातात. त्या वेळी वैजापूर तालुक्यातील साकेगांव येथील “अनाथा चे नाथ” म्हणून साकेगांवकरी घेतात पुढाकार.
सविस्तर वृत्त असे कि, दि. २२ जानेवरी २०२२ रोजी
वैजापूर तालुक्यातील साकेगाव येथील अत्यंत दुर्दैवी घटना घडली, काळाचा आघात होऊन विवाह सोहळ्यासाठी गेले असता अण्णासाहेब साहेबराव आव्हाड, योगिता अण्णासाहेब आव्हाड यांचा अपघाती मृत्यू झाला.
त्यांना चार मुली असुन मुलींच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्रछाया हरपली. त्यांचा संभाळ आता चुलते भाऊराव साहेबराव आव्हाड हे करीत आहेत. वैजापूर तालुक्यातील आमदार बोरणारे यांनी आकांक्षा, प्रतीक्षा, साक्षी, मीनाक्षी ह्या चार ही मुलींना अर्थसहाय्य करत मूलभूत गरजा असणाऱ्या वस्तू खरेदी करून दिल्यात. तसेच दिनेश भाऊ परदेशी यांनी त्या मुलींना संपूर्ण शालेय शिक्षणाची किट दिली व माजी उपसभापती योगिता निकम यांनी चारीही मुली पैकी आकांक्षा या मुलीची संपूर्ण शिक्षण जबाबदारी स्वीकारली तसेच गावातील ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत मार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत साके गावातील ग्रामस्थ व ग्रामसेवक सरपंच यांनी त्या मुलींकडून शिवणकामाचे कोर्स करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न करत आहेत मुलींसाठी अर्थसहाय्य करत त्यांचा सांभाळ करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले आहेत.
तसेच साकेगावातील ग्रामपंचायत ग्रामसेवक यांचे गावातील सामाजिक कामासाठी चांगले योगदान नेहमीच असते असे सरपंच हिराबाई बापू राव आव्हाळे पती बापू नाना यांनी यांच्या स्वखर्चातून अमृतमहोत्सव निमित्ताने बालगोपाल पंगत जिल्हा परिषद शाळेमध्ये दिली व या गावामध्ये सामाजिक धार्मिक अशा अनेक प्रकारचे लोकसहभागातून व गावकऱ्यांच्या संकल्पनेतून कामे केले जातात असे सरपंच बोललेत.