बोरद येथे जलजीवन मिशन अंतर्गत सर्वेक्षण
बोरद (योगेश गोसावी) केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने जल जीवन मिशन योजना संपूर्ण भारतभर राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने बोरद येथे प.स. सदस्य विजय राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरील योजनेच्या कृती आराखडा साठी सर्वेक्षण करण्यात आले.
दोन महिन्यापूर्वी खासदार हिना गावित, आमदार विजयकुमार गावित, जि. प. सदस्य सुप्रिया गावित, पार्वता गावित, माजी जि.प. सदस्य जितेंद्र पाडवी. हे बोरद येथे आले असता सर्व सदस्य विजय राणा यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील, रविंद्र भिलाव,योगेश पाटील,साजन शेवाळे, नितीन पाटील, दिपक जाधव, किशोर टेलर, मनोज पाटील, विठ्ठल धोंडे इत्यादी कार्यकर्ते सह खासदार हिना गावित यांच्याकडे पाण्याचा प्रश्न, बायपास रस्ता, बोरद वेळावद रस्ता इत्यादी कामाची मागणी केली असता त्यांनी त्वरित बोरद गाव हे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत टाकून पाणी मुक्त करणार असे सांगून नंदुरबार येथील सर्वेक्षण माने ,निखिल कराळे अविनाश हरिहर यांनी डी.जी.पी द्वारे पूर्ण गावाचा आराखडा तयार केला. सदर योजना म्हणजे सर्व गावकऱ्यांना वरदान ठरणारी आहे. कारण केंद्र शासनाच्या धोरणानुसार हर घर जल, घर घर जल. तेही ५६ लिटर पाणी देण्याचे धोरण ठरलेले आहे.
विशेष म्हणजे सदरील योजना कार्यान्वित झाल्या पासून २०५२ पर्यंत टिकेल असा शासनाचा मनोदय आहे. याप्रसंगी प.स. सदस्य विजय राणा यांनी सांगितले की जल जीवन मिशन योजना महत्त्वाची असल्याने याबाबत आपण कामाचा दर्जा उत्कृष्ट राखण्यासाठी तसेच सदस्य असल्याने वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वेक्षण करताना ग्रामपंचायत कर्मचारी सतीश राजपूत, मंगलसिंह राजपूत, संजीव भिलाव, रवींद्र ठाकरे, होण्या ठाकरे इत्यादी कर्मचाऱ्यांनी आपले सहकार्य याठिकाणी नोंदवले.