महाराष्ट्र
भुसावळ तालुक्यातील आचेगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती उत्साहात साजरी
भुसावळ (प्रमोद बावस्कर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त त्यांची भव्य मिरवणुक संपूर्ण गावातून ढोलताशांच्या, डिजेच्या गजरामध्ये फार मोठ्या उत्साहात काढण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी मिलिंद मेढे कामगार नेते, जयराज पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसावळ तालुका अध्यक्ष (मागासवर्गीय सेल), प्रकाश सुरवाडे पत्रकार, पुंडलिक पाटील राष्ट्रवादी तालुका चिटणीस, नितीन सुरवाडे पत्रकार, अक्षय बेंडाळे ग्रा पं सदस्य, अमोल डोळस, सतिष सुरवाडे, तसेच गावातील व परिसरातील समाज बांधव शेकडो संख्येने उपस्थित होते.



