नगरपरिषद कार्यालय परतवाडा येथे शिक्षक दिन साजरा शिक्षक हा देशाचा आधारस्तंभ :संदीपकुमार अपार प्रशासक नप अचलपूर
राजेश पडोळे (अमरावती)
अमरावती : पाच सप्टेंबर सोमवार रोजी शिक्षक दिन नगरपरिषद कार्यालय परतवाडा येथे साजरी करण्यात आला शिक्षक हा देशाचा आधारस्तंभ असून भावी पिढी घडवण्यात त्यांची मोलाची भूमिका असते त्यामुळे त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान होणे आवश्यक आहे,असे गौरवास्पद उदगार नगर परिषद अचलपूर प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी अचलपूर संदीपकुमार अपार यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात काढले.प्राथमिक शिक्षण विभाग नगर परिषद अचलपूर द्वारा आयोजित या कार्यक्रमात शिक्षक दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या नगर परिषद शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह नगर परिषदेचे प्रशासक संदीपकुमार अपार यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. देशाच्या विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले व प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे यांनी घेऊन शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित केला,याबद्दल सर्व शिक्षकांनी मनोगतामधून नगरपरिषदेचे आभार मानले. शिक्षक दिनाचा कार्यक्रम प्रत्येक शाळेत साजरा होतो परंतु जे शिक्षक उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करतात विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी सज्ज असतात व त्यासाठी शाळेत अनेक उपक्रम राबवतात वेळ पडल्यास स्वतः जवळून खर्च करतात परंतु शिक्षकांच्या कार्याची दखल घेतल्या जात नाही अशी खंत नगर परिषदेच्या शिक्षकांमध्ये बहुतांशी सापडते परंतु नगर परिषद अचलपूर शिक्षण विभागाने शिक्षक दिनी उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांना त्यांच्या कार्याला योग्य सन्मान दिला आहे.
शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांचा सन्मान होणे असे नगर परिषद मध्ये प्रथमच घडत आहे असे शिक्षकांनी सांगितले.यावेळी प्रशासकीय अधिकारी गणेश जी खडके यांनी शिक्षकांवर आधारित उत्कृष्ट कविता रचून त्याचे सादरीकरण केले.सर्वांनी त्यांच्या कवितेचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगितला नगरपरिषद शाळांमध्ये काही मुख्याध्यापक व शिक्षक अतिशय चांगले कार्य करतात त्यांच्या कार्याची दखल घेणे आवश्यक आहे त्यामुळे शिक्षक दिनाच्या दिवशी अशा शिक्षकांचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला असून शिक्षकांनी नगरपरिषद शाळा नावारुपास आणण्यासाठी आणखी प्रयत्न करावा नगर परिषद सर्व सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत नगरपरिषद शाळांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे प्रशासक संदीपकुमार अपार तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे, कार्यालय अधीक्षक अमोल दहिकर प्रशासकीय अधिकारी गणेश खडके विधी व न्याय सहायक गौरव लोंदे, केंद्रप्रमुख दलाल यांची उपस्थिती होती.अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्रजी फुलझेले यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्यांचा सत्कार नगर परिषदेचे प्रशासक संदीपकुमार यांनी केला.त्यांनी शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक रजनी पडोळे व मोहम्मद कलीम यांनी शिक्षकांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त करून शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षकांच्या कार्याची दखल घेतल्यास त्यांना प्रेरणा मिळते व ते उत्साहाने काम करतात असे मत मनोगतातून व्यक्त केले. मुख्याध्यापक अरुण बोरवार,मजीद शहा, सय्यद जावेद हुसेन,शांता कोकाटे,रजनी पडोळे,मोहम्मद आसिफ तसेच सहायक शिक्षक राजेश विचे,शाह अलकमा फिरदौस,कल्पना राठोड, नजमा परवीन, मालती घटाळे, दीपमाला भुसाटे,दीबा फिरदौस, तसनिम कौसर,संगीता गाडगे, मोहम्मद जाकीर शेख बिस्मिल्ला या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षिका अनुराधा दहीकर यांनी तर आभार प्रदर्शन लिपीक सागर महल्ले यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विजय डांगरे, प्रताप गावंडे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण लिपीक सागर महल्ले सुनिता सदाफळे, रामाभाऊ नाडगे,नगरपरिषद शाळांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.