सुदाम वाडी येथील अनेक वर्षापासून प्रलंबित तंटामुक्ती अध्यक्षपदी ज्ञानेश्वर शंकर पवार यांची बिनविरोध निवड
प्रतिनिधी अशोक पवार
वैजापूर : तालुक्यातील सुदामवाडी येथील अनेक वर्षापासून प्रलंबित पदाचा आज ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या सहमतीने ज्ञानेश्वर शंकर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गावामध्ये काही वाद विवाद झाल्यास गावाला समजूतदार व सुसज्ज नागरिक पाहिजे तो म्हणजे तंटामुक्ती अध्यक्ष गावामध्ये किरकोळ कारणावरून भांडणे किंवा कुणावर अन्याय अत्याचार होत असेल तर तो गावातच मिटायला हवा म्हणून सुदामवाडी येथे ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष पदी गावातील नागरिकांनी एकमतानी ठरावाला पसंती देवुन तंटामुक्ती अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर शंकर पवार यांची बिनविरोध निवड केली.
सरपंच प्रभाकर सोनवणे उपसरपंच सौ. मयुरी जगधने ग्रामविकास अधिकारी घोडेकर तसेच गावातील नागरिक उपस्थित होते भाऊलाल जगधने, गोरख जगधने ,नंदू जगधने, जनार्दन शेवाळे ,दादा होले ,भास्कर पवार ,ज्ञानेश्वर पवार ,विठ्ठल शेवाळे, गौरव शेवाळे ,ज्ञानेश्वर पवार, रमेश जगधने, सागर पठारे, बाबू मोरे, रमेश जगधने, देविदास होले , मोहन सोनवणे, प्रदमाकर शेवाळे, गौरव शेवाळे, किशोर नवले, सतीश नवले ,भाजपा किसन आघाडी तालुका उपाध्यक्ष अशोक पवार आदी मान्यवर व ज्येष्ठ नागरिक होते. यांच्या समूह साह्याने अखेर गावामध्ये तंटामुक्त अध्यक्ष ज्ञानेश्वर शंकर पवार यांची निवड करण्यात आली असल्याने गावातून ज्ञानेश्वर शंकर पवार यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.