महाराष्ट्रराजकीय
शेतकऱ्यांना सुरळीत पाणी मिळण्याकरिता पाटचारी दुरुस्ती करा ; आमदार व धुळे शिवसेना जिल्हाप्रमुखांना निवेदन !
धुळे (प्रतिनिधी) मालनगाव धरणाअंतर्गत घोडदे, सुरपान, छडवेल पखरून, अष्टाने, कावठे येथील शेती शिवारातील मालनगाव धरणातील लाभदायक क्षेत्रातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी पाणी मिळत होते. परंतु सुमारे दहा-पंधरा वर्षांपासून धरणाची पाटचारी व शेतामधील पाटचारी पूर्णपणे निकृष्ट झालेली असल्यामुळे सदर गावातील शेती शिवारातील शेतकऱ्यांना धरणाचे पाणी घेण्यासाठी अडचणी येत असल्याने पाटचारी दुरुस्त करण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करून सदर शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारचे साक्री तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार ना. मंजुळाताई गावित, शिवसेना धुळे जिल्हाप्रमुख डॉ.तुळशीराम गावित यांना देतांना शिवसेना उपतालुकाप्रमुख अमोल क्षीरसागर, सतिष क्षीरसागर, विभागप्रमुख मंगलदास सूर्यवंशी, प्रदीप भोये आदी उपस्थित होते.