महाराष्ट्र
शिंदखेडा येथील खान्देशी रक्षक संस्थेच्या वतीने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या ४४ जवानांना श्रद्धाजंली अर्पण
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील वरपाडे रोडवरील शिवाजी महाराज चौकात शहर व तालुक्यातील खान्देशी रक्षक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफ तुकडीतील शहीद झालेल्या ४४ जवानांना सामुदायिक श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.
शहीद झालेल्या ४४ जवानांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्या स्मरणार्थ आज रोजी काळा दिवस साजरा करुन श्रद्धाजंली व शहीदाबाबत मनोगत अनेक खान्देशी रक्षक माजी सैनिकांनी व्यक्त केले. यावेळी खान्देशी रक्षक संस्थेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गिरासे, उपाध्यक्ष नितीन मिस्तरी, सहसचिव संजीव नगराळे, रक्षक ईश्वर सोनवणे, सिव्हील स.पो तालुकाउपाध्यक्ष हर्षल पाटील, नाना आखाडे आदी तर शहरातील विविध संघटना पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.



