शहरात सार्वजनिक गणेशोत्सव समीति पदाधिकाऱ्यांचे अप्पर पोलिस अधीक्षकांचे हस्ते सत्कार .
दिनांक:- ०९ सप्टेंबर २०२२ (भुसावळ)
प्रतिनिधि-अखिलेशकुमार धिमान
कोरोना कालांतराने दोन वर्षानंतर यंदा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषात साजरा करण्यात आला . भुसावळ शहरात गणेशोत्सव आधी जिल्हापोलिस अधीक्षक डाॅ.प्रवीण मुंढे यांनी घेतलेली बैठकात शहरातील ३५ मंडळपदाधिकाऱ्यांना सूचना व मार्गदर्शन करुन “सार्वजनिक गणेशोत्सव समीति चे गठन करावे” जेणे करुन आगामी काळात कोणतीही अप्गरिय घटना घडुन णेशोत्सवाचे रंगात भंग पडणार नाही.तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी ही सूचना व निर्देश दिले होते.
त्या अनुषंगाने शहरात प्रथमच मुकेश गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली समीति गठित करण्यात आली व दि. ९ रोजी “श्रीं” जींना १० दिवसाचे पूजेअर्चनेनंतर जल्लोषात निरोप देण्यात आले. प्रशासनाने ठरविले वेळेप्रमाणे भुसावळकरांनी बप्पांना निरोप दिले. सदर वेळी जिल्हापोलिस अधीक्षक डाॅ.प्रवीण मुंढे,अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी भुसावळ नगरपालिका मुख्याधिकारी व महावितरण विभागाचे अधिकारी यांना घेऊन केलेले नियोजनास सार्वजनिक गणेशोत्सव समीतिचे पदाधिकाऱ्यांनी तसेच भुसावळकरांनी भरघोस प्रतिसाद देत अत्यंत शांततेत सदर मिरवणुक पार पाडण्यास सहयोग केले. सकाळ पासुन स्वत:अप्पर पोलिस अधीक्षक चरद्रकांत गवळी शहरात उपस्थित होते.मिरवणुक अंती अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव समीति चे अध्यक्ष मुकेश गुंजाळ, उमाकांत (नमा)शर्मा, किरण मिस्त्री, व सर्व पदाधिकारी यांचे सत्कार केले.