पंकज प्राथमिक विद्यालयात स्व. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली
लतादीदींच्या सूर अन् त्यांचं योगदान हे नेहमीच चिरंतर आठवणीत राहील : योगेश चौधरी
चोपडा (विश्वास वाडे) लतादीदींच्या जाण्याने कला क्षेत्राची फार मोठी हानी झाली असून आकाशातील एक दैदिप्यमान तारा निखळला आहे. लतादीदींचा सूर आणि त्यांचं योगदान हे नेहमीच आठवणीत राहील अशा भावना व्यक्त करत चोपडा येथील पंकज विद्यालय प्राथमिक येथे स्व लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
योगेश चौधरी आपल्या मनोगतात म्हणाले की, लता दीदींच्या आवाज सादरीकरण यामुळे शास्त्रीय संगीतात आवाजाचा पोत लालित्य भाव अशा गोष्टींकडे कलाकार अधिक लक्ष देऊ लागले होते .स्वरांची अचूकता गोडवा शब्दांचे उच्चारण इत्यादींच्या त्या कलागुरू होत्या. त्यांचे स्वर सर्वच वयोगटातील कलाकारांना साम्य व्हायचे . त्यांनी चाळीस हजाराहून अधिक गाणी गायली. त्यांच्या सूर कायम अजरामर राहील अशा प्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सदर श्रद्धांजली कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील, पंकज कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे, योगेश चौधरी, सी आर चौधरी, डी एम जैस्वाल, आर डी पाटील, गायत्री शिंदे, जयश्री पाटील, धनश्री जावळे, प्रियंका पाटील, मनोज अहिरे, प्रशांत पाटील, महेश गुजर, प्रफुल्ल महाजन, स्वप्नील ठाकुर, सचिन लोखंडे, मयुर पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेखर पाटील, सईद शेख, दिलीप बाविस्कर, संदीप पाटील, कैलास बोरसे, प्रमोद पाटील, रवी शार्दुल आदींनी परिश्रम घेतले.