भडगावचे आदर्श पत्रकार अशोक परदेशी यांचा मळगाव येथे सत्कार
गोंडगाव ता. भडगाव (सतीश पाटील) भडगावचे आदर्श लोकमत पञकार अशोकबापु परदेशी यांना नुकतेच शिव मल्हार प्रतिष्ठाण व वाघ्यामुरळी परीषद भोर जि. पुणे यांच्यावतीने भोरगड जि. पुणे येथे राज्यस्तरीय आदर्श पञकार समाजभुषण जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याबद्दल मळगाव येथे आयोजीत महिला दिनासह विविध कार्यक्रमप्रसंगी पञकार अशोकबापु परदेशी यांना मळगाव सरपंच गुलाब पाटील यांच्या हस्ते रुमाल टोपी, पुष्पगुच्छ ,नारळ देउन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी भडगाव पंचायत समिती सभापती डाॅ. अर्चनाताई पाटील, पाचोरा उपविभागीय कृषी अधिकारी नाईकवडे, भडगाव तालुका कृषी अधिकारी बी बी गोरडे, वाडे तलाठी गायञी पाटील, भडगाव पंचायत समिती समन्वयक प्रशांत महाले, कार्यक्रमाच्या अध्यक्ष भडगाव माजी नगरसेविका योजनाताई पाटील, वाडेगावच्या माजी महिला उपसरपंच ऊषाबाई परदेशी, मळगाव उपसरपंच निर्मलाताई मोरे, शैलेशभाऊ मोरे, रामकुर्ष्ण मरसाळे, प्रताप परदेशी, न्यानेश्वर पाटील, बालुभाऊ पाटील, ग्रामसेवक एस बी जाधव गणेश पाटील, रोशन मोरे, मळगाव पोलिस पाटील रेशमा जाधव ताई कोतवाल कविता जाधव, तांदुळवाडी CRP मीना पाटील, सुनिता पाटील, अलका रावण गोसावी, भोरटेकच्या संगिता परमेश्वर पाटील, तांदुळवाडी सुरेखा खंडेराव वाघ, बाबंरुड उज्जवला विकास पाटील, निता शरद पाटील, कजगाव बैंक सखी किरणताई कांताबाई गंगाराम सोनवणे, रेखा रामदास मोरे, आशा विठ्ठल कोळी, प्रतिभा रविंन्द्र पाटील, वाडे येथील वंदना अरुण चौधरी, यांचेसह मान्यवर, नागरीक, महिला उपस्थित होत्या.