महाराष्ट्र
बोदवड बसस्थानकाच्या आवारामध्ये खाजगी वाहनांचा सुळसुळाट
बोदवड (प्रतिनिधी) शहरामध्ये शिरसाळा मारूती देवस्थान येथे येणाऱ्या भाविकांची नेहमी वर्दळ असते जामनेर भुसावळ येथून मुक्ताईनगर या रस्त्यावरील शिरसाळा मारूती ते देवस्थानासाठी लोक जात असतात. तरी बोदवड शहरांमध्ये नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे शहरांमध्ये खाजगी वाहनांमुळे अर्थळा निर्माण होत असतो. तसेच गाव शिवाराच्या आत मध्ये बोदवड बाजार आठवड्यातून एकदाच भरत असतो. बाजाराची गर्दी आणि खाजगी वाहनांचा सुळसुळाट यामुळे बोदवडमध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे व महिलांना शौचालयास व बाथरूमला जाण्यास अडचण निर्माण होत आहे. संबंधित असलेल्या प्रशासनाने तात्काळ सदर बाबीकडे तात्काळ लक्ष देण्यात यावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.