शिवसेनेतर्फे मंगळवारी होणार रक्तदात्यांचा सन्मान.
भुसावळ:अखिलेशकुमार धिमान
दिनांक:- १२ सप्टेंबर २०२२
जग प्रगत झालेले असतानाही रक्ताला कुठलाही पर्याय शोधता आलेला नाही. माणसाला फक्त माणसाचेच रक्त लागते. जगामध्ये दर दोन ते तीन सेकंदाला कुणाला ना कुणालातरी रक्ताची गरज भासते. आजकाल धावपळीच्या काळात दिवसेंदिवस रक्ताची मागणी वाढते आहे. अपघात, छोट्यामोठ्या शस्त्रक्रिया, प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव, विविध आजार, तसेच थॅलेसिमिया सारखे रक्ताशी निगडीत इतर आजार, मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती, या कारणांमुळे रक्त व रक्तघटकाची मागणी वाढते आहे. अशाच गरजेच्या प्रसंगी रक्तदानासाठी धावून जाणाऱ्या रक्तदात्यांचा सन्मान सोहळा दिनांक १३ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २. ०० वा, शिव मंडळ व शिवसेना भुसावळ तर्फे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मोटुमलजी चौक जामनेर रोड भुसावळ येथे होणार आहे.
भुसावळ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना पदाधिकारी कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे.
रक्तदान करुन रुग्णांसाठी जीवनदान दिलेले आहे अशा दात्यांचे व रक्तदान शिबीर, ग्रुप संयोजक यांनी रक्तदान शिबीरे आयोजित केल्याबाबत त्यांचे आभार मानणे व युवा वर्गामध्ये नियमितपणे स्वैच्छिक रक्तदान करण्यासाठी व्यापक जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत असे संयोजक उमाकांत (नमा) शर्मा यांनी सांगितले.