महाराष्ट्र
जामूनपाडा जि.प. शाळेचे मुख्याध्यापक रतन भोये यांचा सेवापूर्ती कार्यक्रम
साक्री (प्रतिनिधी) तालूक्यातील जामूनपाडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रतन भोये यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आज प्रमुख पाहुणे साक्री पंचायत समितीच्या सभापती प्रतिभाताई पंकज सूर्यवंशी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहोड केंद्राचे केंद्र प्रमुख वा.रा सोनवणे, पंकज सूर्यवंशी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष साक्री व रोहोड केंद्रातील सर्व मुख्याधपक व शिक्षक वृंद व विध्यार्थी व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थिती होते. आपले कर्तव्य बजावून सेवा निवृत्त होणारे रतन भोये यांचा सत्कार व त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा साक्री पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांनी आज दिल्या.