महाराष्ट्र
पिंपळगाव विभागातील वृक्ष कोमजले ; सामाजिक वनीकरण विभागाकडून कानाडोळा
बोदवड (पितांबर बावस्कर) पिंपळगाव विभागातील वृक्ष कोमजले असून सामाजिक वनीकरण विभाग लोणवाडीच्या मुक्ताईनगर परिक्षेत्र योजनेअंतर्गत बोदवड तालुक्यातील लोणवाडी ते पिंपळगाव देवी दरम्यान तीन किलोमीटर परिसरात 22 हजार रोपट्यांची लागवड 2021 मध्ये करण्यात आली. परंतु, यातील बरसी रोपटे वाळलेल्या स्थितीत आहे.
यात सामाजिक वनीकरणतर्फे संगोपन व संवर्धनाचे योग्य नियोजन नसल्याने वृक्षलागवड फसल्याचे दिसून येते या वृक्षाचे संवर्धन योग्य प्रकारे व्हावी अशी मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे.