महाराष्ट्र
अखंड हरिनाम सप्ताहात दुसऱ्या दिवशी ह भ प प्रा डॉ राधाकृष्ण महाराज अकोलकर यांचे कीर्तन
वैजापूर (अशोक पवार) क्षेत्र शिवुर ता वैजापूर येथे संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहात दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात ह भ प. प्रा डॉ राधाकृष्ण महाराज अकोलकर संतपीठ पैठण यांचे कीर्तन झाले. अणुरेणु या थोकडा तुका आकाशाएवढा या अभंगावर निरूपण केले. यावेळी महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार ह भ प अनिल महाराज पाटील, विश्वस्त जोग महाराज संस्थान आळंदी, तुकाराम महाराज आश्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मधाने महाराज, सारंगधर महाराज भोपळे, उपाध्यक्ष शंकर स्वामी महाराज संस्थान, आश्रमाचे कार्याध्यक्ष भगवान महाराज ठुबे, तसेच सफियाबादवाडी, शिवुर व परीसरातील भजनी मंडळ वारकरी ग्रामस्थ गावकरी नागरिक उपस्थित होते.