गुटखा गोडावून सह सट्टापेढी वर सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांची मोठी कार्यवाही – १२ लाखांचा मुद्देमाल जप्त.
विशेष प्रतिनिधि- अखिलेशकुमार धिमान
दिनांक-१९ सप्टेंबर २०२२
जळगाव : दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी सांयकाळी जळगांव चे सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी सिंधी कॉलनी परिसरातील भाजीपाला मार्केट परिसरात गुटखा गोडावून तसेच सट्टापेढी वर धाड टाकून सुमारे १२ लाखांचे रोख व मुद्देमाल जप्त केले आहे या बाबत सविस्तर वृत्त असे कि,
सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना शहरातील सिंधी कॉलनी परिसरात खुशी किराणा दुकानात गुटख्याचा मोठ्या प्रमाणाावर साठवणुक करण्यात आल्याच्या माहितीवरुन छाप्याचे नियोजन करण्यात आले.सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी स्वतः या ठिकाणी अचानक छापा टाकला असता त्यांना भाजीपाला मार्केट मधील रमेशचंद्र जेठानंद चेतवाणी, दिपक रमेश चेतवाणी (रा.कंवरनगर) यांच्या खुशी किरणा दुकानात सुमारे ७ लाख ८२ हजार ४६४ रुपयांचा गुटख्याचा साठा आढळून आला .
सदर कार्यवाही दरम्यान त्याच परिसरात सट्टापेढी सुद्धा चालत असल्याची कुमारचिंथा यांचा लक्षात आले व त्यांचे पथकाने तेथे सुद्धा छापा टाकला असुन सट्टापेढीतून ४ लाख ६७ हजार १२० रुपयांची रोकड सह सट्टटेसाठी वापर होत असणारा साहित्य जप्त करुन काही लोकांना अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे सदर हद्द ही एमआईडीसी पोलिसांची असुन झालेली कार्यवाहीत शहर पोलिस स्टेशनातील अधिकारी व कर्मचारींचे पथक होते. कदाचित खुलेआम सर्रासपणे येवढंमोठा प्रमाणात गुटख्याचा साठा व सट्टापेढी ही एमआईडीसी पोलिसांचा आशीर्वादानेच सुरु असेल म्हणूनच सहायक पोलिस अधीक्षक कुमारचिंथा यांनी शहरपोलिसांचे पथकांची नियुक्ति केली असावी अशी चर्चा परिसरात सुरु होती.
सहाय्यक पेालिस अधीक्षकांच्या पथकातील उपनिरीक्षक दत्तात्र्यय पोटे, सुनील पाटिल, प्रदिप बोरुळे, प्रमोद कठोरे, विनयकुमार देसले, किरण धनके, महेश महाले, रविंद्र मोतिराया अशांच्या पथकाने सट्टापेढीतून ४ लाख ६७ हजार १२० रुपयांची रेाकड तसेच ७ लाख ८२ हजार ४६४ रुपयांचा गुटख्याचा साठा असे पंचानामा करुन एकुण १२ लाख ४९ हजार५८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सहाय्यक पेालिस अधीक्षकांच्या पथकातील उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या फिर्याद वर एमआयडीसी पेालिसांत संशयीतांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.