
कन्नड : (विशाल भालेराव) ग्रामीण रुग्णालय येथे प्रसूती साठी आलेली महिला जयश्री चव्हाण यांना प्रसूती वेदना सुरू असताना, रुग्णालय नियमानुसार गरोदर महिलेला निरीक्षण कशात ठेवायला हवे होते. असे काहीही न होता. संबधित महिलेला जनरल वार्ड मध्ये ठेवण्यात आले.
प्रसूतीच्या ठराविक काळात देखील. दवाखान्यातील कर्मचारी महिलेकडे लक्ष द्यायला तयार नव्हते. उलट उद्धट वागणूक देऊन. महिलेला जनरल वार्ड मध्ये एकटे सोडल्याची धक्कादायक घटणा कन्नड येथील ग्रामीण रुग्णालय घडली. महिलेची प्रसूती होत असताना एकही डॉक्टर तसेच परिचारिका वार्ड मध्ये नव्हती. सुदैवाने महिलेची प्रसूती सुखरूप झाली पण यदाकदाचित काही इमर्जन्सी घटना घडली असती तर महिलेच्या जीवाची हमी नेमकी कुणाची असा प्रश्न परिसरात बोलला जात आहे. डॉक्टर व संबधीत कर्मचारी यांच्यावर कार्यवाही होणार कि पाठीशी घालणार हा सवाल महिलेच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.