केंद्रीय विद्यालय भुसावळ येथे “एक भारत श्रेष्ठ भारत” उपक्रमाचे आयोजन.
अखिलेशकुमार धिमान
दिनांक: ०४ आँक्टोबर २०२२
भुसावळ: केंद्रीय विद्यालय भुसावळ येथे शाळेचे प्राचार्य नितीन उपाध्याय यांच्या मार्गदर्शना खाली एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत ओडीशा राज्य केंद्रीय विद्यालय बरगड सह व्हिडिओ कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे प्रभारी प्राचार्या सौ रंजना विगम यांनी दीपप्रज्वलन करुन केल.
सदर कार्यक्रमांतर्गत केंद्रीय विद्यालय ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ तसेच केंद्रीय विद्यालय बरगड ओडिशा या दोन्ही शाळांनी भाग घेतला व एकमेकांच्या संस्कृती परंपरा ऐतिहासिक कलेचे सुंदर सादरीकरण आभासी माध्यमाद्वारे करण्यात आले. केंद्रीय विद्यालय भुसावळ यांनी ऐतिहासिक सांस्कृतिक कलेचे सादरीकरण केले तसेच ओडिशा राज्यातील केंद्रीय विद्यालय बरगड यांनी महाराष्ट्रीयन परंपरेचा सांस्कृतिक कलेच्या सादरीकरण केले त्यामुळे दोन्ही राज्यांच्या ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरेचा देवाण घेवाण या कार्यक्रमांतर्गत झाली. केंद्रीय विद्यालय भुसावळच्या विद्यार्थ्यांनी “रंगो बाॅती रंगो बाॅती” तसेच संबल पुरी ओडिया लोकनृत्य व संस्कृतीवर भाषण इत्यादी कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संचालन सीमा बाथम यांनी केले त्याप्रसंगी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुरेश नरहिरे आणि संदेश सर उपस्थित होते.