ब्रेकिंग
Trending
कन्नड येथील बाळा साहेब चौक येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन
रक्तदात्यानी रक्तदान करून मानवतेच्या दृष्टीने महत्वाचे काम केले
कन्नड : येथील बाळा साहेब चौक येथे, स्थानिक सामाजिक संघटनांनी मिळून महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.. शहारात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अनिल भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शन खाली ,स्थानिक पातळीवर जनता दरबार फाउंडेशन, साई फाउंडेशन ,श्री महाकाल फाउंडेशन, टायगर ग्रुप, महाकाल फाउंडेशन तसेच देवा फाउंडेशन च्या सहकाऱ्यांनी मिळून.रक्तदान शिबिराची मोहीम राबवली…तसेच अनिल भाऊ चव्हाण यांच्या प्रेरणेने १०४ रक्तदात्यानी रक्तदान करून मानवतेच्या दृष्टीने महत्वाचे काम केले. असल्याने आयोजकांनी त्यांचे आभार मानलेत.
यासाठी कन्नड शहराच्या सामाजिक संघटनांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
