वेडवहाळ व वेहलोंडे या गावातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जी.आय. मानांकन मिळणार
शहापूर (देविदास भोईर) तालुका कृषी अधिकारी, शहापूर यांच्या माध्यमातून हॉर्टसँप अंतर्गत आंबा फळपिक उत्पादक शेतकऱ्यांची शेतीशाळा वेडवहाळ व वेहलोंडे या गावी पार पडली. या शेतीशाळेला स्थानीक आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस्फुर्त प्रतीसाद मिळाले. या कार्यक्रमाला ए. डी. सिनकर कृषि पर्यवेक्षक, खर्डी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली त्यात शेतीशाळेची आंबा फळपिक परीसंस्था (Mesa), आंबा फळपिक लागवडीचे तंत्रज्ञानाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. खर्डी विभागाचे कृषि सहाय्यक गोकुळ आहिरे यांनी आंबा पिकावरील किड व रोग व्यवस्थापन कसे करावे याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे शंकेचे निरसन केले.
आंबा पिकावरील लागवडीपासून किड व रोग व्यवस्थापन, मोहर संरक्षण, उत्पादन, मार्केटिंग, कृषिक अँप चे महत्व, PMFME योजनेची माहीती, हापुस पिकाचे Geographical Index मानांकन कसे करावे याबाबत विस्तृत माहिती मा. रविंद्र घुडे साहेब मंडळ कृषी अधिकारी, खर्डी यांनी मोलाचे मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले. भावसे विभागातील कृषी सहाय्यक भरत पवार यांनी उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे व कृषी विभागातील अधिकारी – कर्मचारी यांचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाची सुत्रसंचालनाची धुरा या विभागातील नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय असणारे देविदास भोईर यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित पांडुरंग भोईर, अशोक भोईर, नारायण पाहुणे, अनंता भोईर, मिठाराम भोईर, भास्कर वेखंडे, पांडुरंग पावणे, विठ्ठल भोईर, माधव भोईर, भरत भोईर, सुरेश भोईर, सुनिल घरत, राहुल भोईर व परिसरातील सर्व आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते कार्यक्रम संपल्यानंतर परीसरात दिलेल्या कृषि विभागातील योजनांची पाहणी मंडळ कृषी अधिकारी रविंद्र घुडे यांनी मग्रारोहयो योजनेतील आंबा घन लागवड, मोगरा लागवडची पाहणी केली व परिसरातील सर्व मोगरा व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना ठिबक, नाडेप, गांडूळ खत युनिट, शेततळे, पँकहाउस, शेतीशी निगडित औजारे त्यात ट्रँक्टर, पॉवरटिलर, रोटँव्हेटर, गवत कापणी यंत्र, भात कापणी यंत्र इ. औजारे या योजना मोठ्या स्वरूपात राबवण्याचे आवाहन केले व त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करणार असे आश्वासन दिले.