महाराष्ट्र
सोलापूर येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने डिझेल- पेट्रोल, गॅस दरवाढ विरोधात केंद्र सरकारचा जाहिर निषेध
सोलापूर (वैजीनाथ धेडे) सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने संगेवाडी तालुका सागोला येथे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजकुमार पवार याच्या नेतृत्वाखाली डिझेल- पेट्रोल, गॅस दरवाढ विरोधात केंद्र सरकारचा जाहिर निषेध करण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभिषेक कांबळे, जिल्हा युवक काँग्रेस महासचिव वैजीनाथ धेडे, कमिटीचे अजयसिह इगोले, अध्यक्ष तालुका युवक काँग्रेसचे सुनिल नागणे पाटील, मागासवर्गीय सेल जिल्हा उपाध्यक्ष विजय वाघमारे उपस्थिती होते. यावेळी सागोला तहसीलदार अभिजीत पाटील याना निवेदन देण्यात आले. मोदी सरकारचा जाहिर निषेध करण्यात आला.