सोयगाव येथे रमजान ईद निमित्त पोलीसांचे पथ संचलन
सोयगाव : सोयगाव येथे रमजान ईद निमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सोयगाव पोलीसांचा औरंगाबाद येथील दंगा काबू पथक द्वारे सोयगाव शहरामध्ये पोलीसांचे पथ संचलन काढण्यात आले होते.
यावेळी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुदाम शिरसाठ यांनी दि.२५ सोमवारी रोजी सोयगाव शहरातून बाजार चौक, वाल्मीक पुरा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पर्यंत पथसंचलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मोब ड्रिल चे प्रात्यक्षिक करून दाखवले हे पथसंचलनाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला. यावेळी सोयगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सतीष पंडित, सागर गायकवाड, गणेश रोकडे, ज्ञानेश्वर सरताळे, रवींद्र तायडे, राजू बरडे, सादिक तडवी, संदीप सुसर, अजय कोळी, सुके, महिला पोलीस कर्मचारी भाग्यश्री चव्हाण, कविता कांदे, प्रियंका बोडखे आदींसह उपस्थित होते.