अपघातग्रस्तांना मदतीचा हात द्या ; डॉ. मधुकर पाटील यांचे प्रतिपादन
धुळे (करण ठाकरे) अपघातात सापडलेल्या एखाद्या व्यक्तीला मदत करणारा देव वाटतो. त्यामुळे आपल्या सर्वांना देवाचे कार्य करण्याची संधी आहे. अपघातात सापडलेल्या कुणालाही तत्काळ मदत करा, त्यामुळे तुम्हालाही समाधान आणि आशीर्वाद मिळतील असे प्रतिपादन एसीपीएम मेडिकल कॉलेज वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर पवार यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर डॉ. आर. व्ही. पाटील, महामार्ग विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी सचिन सावंत, यशोदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चुनीलाल सैंदाणे, साक्री पोलीस ठाण्याचे सहायक पोलीसनिरीक्षक एच.एल. गायकवाड, जिभाऊ मासुळे, अॅड. राकेश काकुस्ते, प्रवीण खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. मधुकर पवार म्हणाले की, पोलिसांच्या मृत्युंजय दूत योजनेसाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनचे खारीचा वाटा म्हणून १० स्ट्रेचरची मदत केली. यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, आमदार कुणाल पाटील, डॉ. ममता पाटील यांची मोलाची मदत लाभली. दरम्यान यापुढेही आमची संस्था कायम मदतीसाठी तयार असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी हेमंत भामरे, अजय सोनावणे, किशोर साळुंखे, दादाजी मारनर, राजेंद्र सोनवणे, विकास मोहिते, जगदीश पाटील आदी उपस्थित होते.