महाराष्ट्रशेत-शिवार
दोन वर्षांपासून डिमांड नोट भरूनही बहापूरा येथील शेतकरी विज कनेक्शनपासून वंचित
बुलढाणा (पंकज मोरे) मलकापूर तालुक्यातील मौजे बहापूरा येथील शेतकरी रमेश देवचंद पवार यांचे नावाने बहापूरा शिवारात गट न ६५ मध्ये शेती असून या शेतात एक विहीर गेल्या ४ वर्षापासून खोदलेली आहे. या शेतात पवार यांनी विज कनेक्शन करिता दि ७ डिसेंबर २०१९ रोजी रितसर अर्ज विज मंडळाकडे दाखल केलेला असून डिमांड नोट भरून २ वर्षे झाली आहेत.
सदरहू शेतकऱ्याचे शेतात विजेचे खांब टाकूुन सर्विस लाईनची वायर ओढून डिपी सुध्दा बसवली आहे. परंतु विहिरीवर विज कनेक्शन मात्र २ वर्षापासून देण्यात आलेले नाही. याबाबत वारंवार कार्यालयात चकरा मारून काही उपयोग झाला नाही. शेवटी सदर शेतकऱ्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायतमध्ये धाव घेऊन न्यायची मागणी केली आहे. तरी पवार यांना विज मंडळ व ग्राहक पंचायत कडून न्यायची प्रतिक्षा आहे.