गुन्हेगारीमहाराष्ट्र

सोनगीर गावाच्या शिवारातून गायची वाहतूक ; सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धुळे (विक्की आहिरे) धुळे तालुक्यातील सोनगीर गावाच्या शिवारातुन गाईंचे वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी एका विरुद्ध सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील शहरातून जाणारी मिनीडोर(MH 04 PF 1970) मधून गायांची वाहतूक केली जात होती. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर हे वाहन पोलिसांनी अडवल्यावर हा प्रकार समोर आला. या गायींना निर्दयपणे बांधून अवैधरित्या वाहतूक करण्यात येत होती. याप्रकरणी मधुकर रामदास लोंढे (वय ५५ रा.वरपाडारोड, शिंदखेडा) यांच्या विरोधात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे