कामगारांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन द्या !
धुळे (करण ठाकरे) येथील महापालिकेच्या हिवताप विभागात नाशिक येथील खासगी ठेकेदारचे कामगार कार्यरत आहेत. या कामगारांचे नोव्हेंबर महिन्यापासून वेतन थकल्याने मंगळवारी महापालिकेत कामगारांनी निदर्शने करीत थकीत वेतन द्या अशी मागणी करीत, आयुक्तांना निवेदन दिले.
शहरातील डास निर्मुलन करण्याचा ठेका महापालिकेकडून नाशिक येथील एका कंपनीला देण्यात आला आहे. त्यात अनेक कामगार कार्यरत आहे. कोरोनासह डेंग्यू, मलेरिया, चिकुन गुणिया अशा नैसगिक आपत्तींमध्ये कर्मचाऱ्यांनीप्रामाणिकपणे काम केले आहे. मात्र कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०२१ पासून जानेवारी २०२२ पर्यत असे तीन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. यामुळे क कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाची उपासमार होत अ आहे. तीन महिन्यापासून वेतन नसल्यानेकर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. तर मुलांचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे.कंपनीशी समन्वय साधून वेतन अदा करावे अन्यथा कर्मचारी तीव्र आंदोलन करीत असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आले.
प्रशासनाकडून विचार करून करण्यासाठी आला आहे. यावेळी आंदोलकांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी केली. याप्रसंगी महेश भवरे, शेखर पवार, योगेश शिंदे, आंनद साळवे, करण परदेशी, हरीष वराडे, प्रशांत कोळवले, जितेंद्र वाघ, निलेश परदेशी, ज्ञानेश्वर दा खैरनार, प्रफुल्ल वाघ, राहूल आव्हाड, नन कपिल काळे, वैभव चौधरी, राहूल त सोनवणे आदी उपस्थित होते.