हिंदी सेवा मंडळ संचालित श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालय येथे स्काऊट गाईडचे शीतकालीन शिबिराचे आयोजन.
भुसावळ-अखिलेशकुमार धिमान
दिनांक: ३१ डिसेंबर २०२२
काल दिनांक ३० डिसेंबर रोजी हिंदी सेवा मंडळ संचालित श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्काऊट आणि गाईडचे शितकालीन शिबिर २०२२-२३ आयोजित करण्यात आले होते.सदर शिबिराचे कार्यक्रम अध्यक्ष स्थानी हिंदी सेवा मंडळ चे उपाध्यक्ष गोपालदास ताराचंदजी अग्रवाल तसेच कोषाध्यक्ष अँड.महेशदत्त तिवारी व महामंत्री श्रीमती मधुलता शर्मा व सौ.आरती दीदी हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून डाएटचे अधिवक्ता शैलेश पाटील तसेच विविध विद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य व माजी मुख्याध्यापक शिक्षक गण उपस्थित होते.
सर्वप्रथम मंच आसीन सर्व मुख्य अतिथी गणांच्या हस्ते माता सरस्वती यांचे पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून पूजन करण्यात आले.व लॉर्ड बेडन पावेल यांची प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्काऊट व गाईड चे झेंडा फडकवून स्काऊट गाईडचे झेंडा गीत,स्काऊट गाईडचे प्रार्थना,व प्रतिज्ञा चे वाचन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमास उपस्थित अतिथी मान्यवरांचे श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चे मुख्याध्यापक व्ही.एस.पाठक यांनी शाँल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अतिथींचे परिचय उपमुख्याध्यापक पी. सी.आठवले यांनी करून दिले. मान्यवरांच्या हस्ते हिंदी सेवा मंडळ चे माजी महामंत्री स्व. देवीप्रसाद शर्मा यांचे फोटोचे अनावरण करुन “दर्पण” पुस्तिका चे विमोचन करण्यात आले.स्काऊट गाईडचे विद्यार्थ्यांनी स्वागत गीत क्लॅप व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
स्काऊट गाईडचे विद्यार्थ्यांनी तयार केलेले कॅम्पचे निरीक्षण मान्यवरांनी केले तसेच विद्यालयातील शैक्षणिक उपक्रमाचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस.वाय. तिवारी व आभार पी.बी. गायकवाड यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.
https://youtube.com/channel/UCIEJK-1t0MDN0BhTn6EbEXg
http://www.speednewsmaharashtra.com