मराठा बोर्डिंगच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा
धुळे (विक्की आहिरे) तालुक्यातील काळखेडा येथील जी. जो. अग्रवाल मराठा बोडिंगच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रविवार 27 फेब्रुवारी रोजी काळखेडा येथील गावातील नारायण भूरमल पाटील शैक्षणिक संस्थेत संपन्न झाला. मराठा बोर्डिंगच्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कारासह परिचय व चर्चासत्राबाबत वि. ज. भ. ज प्राथमिक आश्रमशाळेचे अध्यक्ष तथा धुळे तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक – शांताराम पाटील यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. आणि स्कूल या वेळी शांताराम पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोरोनानंतर अनेकांचे जीवनमान, परिस्थिती बदलली आहे. शाळाही मोठ्या कालावधीसाठी बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभावे व त्यांना माजी विद्यार्थ्यांच्या अनुभव कळावे या उदात्त हेतूने या स्नेहसंमलेनाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्नेहसंमेलनात माजी विद्यार्थ्यांनी स्फूर्त प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदवला. हे स्नेहसम्मेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. गेले कित्येक वर्षांनी माजी विद्यार्थी असलेल्या सर्वानी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत दिवसभरात आपल्या सहविद्यार्थी असलेल्या प्रत्येकाविषयी माहिती जाणून घेतली व जीवनातील एक सोनेरी क्षणांचा आनंद आठवणींत साठविला. प्रत्येक माजी विद्यार्थी हे आपली आठवण ताजी करतांना प्रत्येकजण भावविभोर झाले. आठवणींच्या पडद्याआड गेलेले आपले वर्गिमत्र-मैत्रीणी भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्यावरून ओसंडून वाहत होता. यावेळी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देतांना सर्वांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते.