महाराष्ट्र
आदिवासींचा पायी मोर्चा आज शहरात धडकणार
धुळे (विक्की आहिरे) वनजमीन करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना सातबारा उतारा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढला आहे. हा मोर्चा सोमवारी दि. २८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
मोर्चात आदिवासी शेतकरी सहभागी झाले आहे. मोर्चाला शिरपूर तालुक्यातील सांगवी येथून प्रारंभ झाला आहे. मोर्चा गावात आल्यावर नवीन दरवाजा चौकात सभा झाली. प्रमोद पाटील, अॅड. हिरालाल परदेशी, अॅड मदन परदेशी, कॉ वसंत पाटील, डॉ किशोर सूर्यवंशी आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



