ऐनगावच्या सरपंचपदी अन्नपूर्णाताई कोळी यांची बिनविरोध निवड
बोदवड( सतिश बावस्कर) तालुक्यातीत ऐनगाव येथे सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी एम एस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या ठिकाणी ग्रामसेवक सांगळे हे उपस्थित होते. या निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्य कोळी यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णयअधिकाऱ्यांनी घोषित केले.
निवडणूक कामी ग्रा.प. क्लर्क कर्मचारी यांनी सहकार्य केले. निवड यशस्वीरित्या पार पाडली. प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे भैय्यासाहेब पाटील व पंचायत समितीचे सभापती किशोर भाऊ गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुका अध्यक्ष विनोद कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सरपंच अन्नपूर्णाताई विनोद कोळी यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल गावातील नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. व शुभेच्छा देण्यात आल्या ग्रामपंचायत सदस्य सुरेखाताई तळेले. सारिका बोंडे, नीतू खाचणे, शारदाबाई पारधी व महेंद्र बोंडे निवृत्ती बोंडे, महेश तळेले व इतर नागरिक उपस्थित होते.