महावितरणच्या आडमुठे धोरणामुळे गहू पिकांचे नुकसानीची भरपाई मिळावी ; शेतकऱ्याची मागणी
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील रोहाणे परिसरात शेतातील मेन लाईन डिपी जळाल्याने शेतात पेरणी केलेल्या गहू पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही म्हणून समाधान शालिक धनगर या शेतकरीचा गहु जळुन खाक झाला आहे. याला जवाबदार कोण? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
रोहाणे शिवारात गेल्या पंधरा दिवसांपासून शेतात पोलवरील लाईनची डिपी जळाल्याने शेतात गहू पेरणी केला होता. त्या गहु पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही. म्हणून शेतातील गहु जळुन खाक झाला आहे. त्यामुळे शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्याने नविन डिपी बदलुन मिळावी, अशी मागणी सबस्टेशन मुकटी येथे ठाकूर अधिकारी व वायरमेन महाले यांच्याकडे अनेकदा केली. त्यासाठी पाठपुरावा केला तुमच्याकडे बिल थकबाकी आहे. असे उडवाउडवीची उत्तरे वायरमेन यांनी शेतकऱ्याला दिली ते शेतकरी बिल भरण्यास तयार होते. यापुर्वी बिलची मागणी का केली नाही. कारण वायरमन व साहेब यांच्या संगनमताने बिलापोटी वरच्या वर चिरीमिरी होत आहे. असे शेतकरी यांनी सांगितले.
तरीही नविन डिपी मिळत नाही गेल्या पंधरा वीस दिवसांपासून महावितरण कंपनीचा आडमुठे धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्या शेतकरीचा जळालेल्या गहू पिकांचे पंचनामा करून आर्थिक भरपाई मिळावी ती भरपाई महावितरणच्या लाईनमेन (वायरमेन) यांच्या कडून वसुल करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. सदरचे निवेदन तहसीलदार शिंदखेडा यांना देखील दिले आहे. या शेतकरी वर झालेल्या अन्यायाची दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये चे नुकसान झाले आहे. अन्यथा हा बळीराजा कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.