विद्यार्थ्याचा श्वसन नलिकेत च्युईंगम अडकल्यामुळे मृत्यू
भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नववीच्या विद्यार्थ्याचा श्वसन नलिकेत च्युईंगम अडकल्यामुळे त्याच्या मृत्यू झाल्याची घटना घडली. उमेश गणेश पाटील (वय १५ पांढरद ता.भडगाव) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
भडगाव तालुक्यातील पांढरद येथील रहिवासी असलेला उमेश गणेश पाटील हा भडगाव येथील लाडकु बाई विद्यामंदिर या शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होता. गुरुवारी शाळा सुटल्यानंतर त्याने च्युईंगम घेतली आणि गावी जाण्यासाठी रिक्षात बसला. च्युईंगम त्याच्या श्वसन नलिनीकेत अडकल्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला तात्काळ भडगाव येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला पाचोरा येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्याला पाचोरा येथे नेत असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. गुरुवारी त्याचा गणिताचा पेपर होता त्याने परीक्षा दिली. दुपारी च्युईंगम चिघळत असतांनाच हा प्रकार घडल्याचे शाळेच्या सूत्रांनी सांगितले. उमेश गणेश पाटील याचे वडील गणेश पाटील हे शेतकरी आहेत. या घटनेमुळे पांढरद येथे हळहळ व्यक्त होत आहे.