चोपडा
भारतीय सागरी सुरक्षेसाठी नौदलाचे योगदान महत्त्वाचे : प्रा. दिपक देवरे
चोपडा (विश्वास वाडे) पंकज कला व विज्ञान महाविद्यालयात संरक्षण शास्त्र विभागद्वारे भारतीय नौदल दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी प्रा. दिपक देवरे यांनी भारतीय नौसेनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करुन सांगितली. तसेच १९७१ च्या युद्धातील भारतीय नौसेनेच्या ऐतिहासिक कामगिरीचा उल्लेख करून ऑपरेशन ट्रायडेंट याबद्दल माहिती सांगितली.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना नौसेनेतील करिअरच्या संधी विषयी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजय के. पाटील यांनी केले, तर आभार प्रा. अजय पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.