संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकाचे आयोजन
सोयगाव : अजिंठा शिक्षण संस्थेचे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग, क्रीडा विभाग व करियर कट्टा अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त शिबिर घेण्यात आले. यावेळी योगशिक्षक म्हणून श्री विवेक जोशी यांनी योग प्रात्यक्षिके करून दाखविले या शिबिरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी,सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ.विनोद बारोटे यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ गणेश अग्निहोत्री यांनी या कार्यक्रमाचे समारोप करताना अध्यक्षीय भाषणात योग ही काळाची गरज असून तरुणांनी योग व प्राणायाम करणे अत्यंत गरजेचे आहे असे नमूद केले. सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये योग मनुष्याच्या मनावरचे ताण तणाव चे व्यवस्थापन करू शकते त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दररोज सकाळी अथवा संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा दहा ते वीस मिनिटे स्वतःसाठी द्यावी जेणेकरून त्यांचे जीवन सुकर होईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिअर कट्टा समन्वयक व मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र समन्वयक डॉ. लक्ष्मीनारायण कुरपटवार यांनी केली तर आभार रसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. रामेश्वर मगर यांनी मानले तर या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे उपप्राचार्य डॉ. शिरीष पवार यांची उपस्थिती होती. क्रीडा विभाग प्रमुख डॉ नीलेश गाडेकर व शंकर काळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आयोजन व नियोजनाची भूमिका पार पाडली.