शासकीय धान्य गोदामात अधिकारी व कर्मचारींचा संगमताने लाखोंचा भ्रष्टाचार – ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
भुसावळ-अखिलेशकुमार धिमान
दिनांक : ३१ डिसेंबर २०२२
भुसावळ-शहरातील शासकीय धान्य गोदामात अधिकारी व कर्मचारींचा संगमताने लाखोंचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध भुसावळ शहरपोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि,भुसावळ येथील शासकीय धान्य गोदामात तत्कालीन तहसीलदार विशाल नाईकवाडे, तत्कालीन तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तत्कालीन तहसीलदार बोदवड रवींद्र जोगी,प्रभारी तहसीलदार एस.यु.तावडे,तत्कालीन उपविभागीय अधिकारी भुसावळ श्री.कुमार चिंचकर तत्कालीन गोदाम व्यवस्थापक भुसावळ. आर.एल. राठोड यांनी संगनमताने जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करून सरकारने दिलेल्या रेशन धान्याच्या साठ्यात ३९१.९२ क्विंटल रेशनचे (धान्य गहू, साखर, ज्वारी ) किंमत ७,२७,२४४,१७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी फिर्यादी आशिष प्रमोद गिरी वय ३६ धंदा वकिली राहणार १४ ए कॉमर्स हाऊस,तळमजला नगीनदास मास्त, रोड काळाघोडा मुंबई २३ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघन यांच्या आदेशावरून दिनांक ३०/१२/२०२२ रोजी सायंकाळी ०६.५६ वाजेला भुसावळ शहर पो.स्टे.ला गु.र.नं. (M)no.0187/2022कलम420,120B,166,166A,167,168,107,108,119,120,182,191,192,196,217, 218 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा विलंबाने नोंद का? काय आहे कारण?
गुन्हा दाखल विलंबाचे कारण माननीय जिल्हाधिकारी यांचे दिनांक २० मे २०२० च्या आदेशाचे पूर्वी वेळ नमूद नाही यावरून मा.२ रे दिवाणी व फौजदारी न्यायालय भुसावळ यांच्याकडून फौजदारी क्री अर्ज क्रमांक ०७/२०२२ चे कागदपत्र सी.आर.पी.सी. १५६(३) प्रमाणे चौकशीसाठी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या ने त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.
https://youtube.com/channel/UCIEJK-1t0MDN0BhTn6EbEXg
http://www.speednewsmaharashtra.com