महाराष्ट्र
प्रतिष्ठित व्यापारी विष्णूदयाल अग्रवाल यांचे वृद्धापकाळाने निधन
साक्री (प्रतिनिधी) येथील गेल्या अर्ध्या शतकाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अग्रवाल संसार वस्तू भांडारचे मालक येथील प्रतिष्ठित व्यापारी विष्णूदयाल शंकरलाल अग्रवाल यांचे दिनांक 13 मार्च रोजी वयाच्या 88 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले ते येथील न्यू इंग्लिश स्कूलचे निवृत्त प्राचार्य राजेंद्र अग्रवाल व प्रतिष्ठित व्यापारी नरेंद्र उर्फ नरूशेठ अग्रवाल यांचे वडील होते. साक्री येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी तसेच शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर व नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते. विष्णू दयाल शेठ अग्रवाल यांना स्पीड न्यूज महाराष्ट्रची भावपूर्ण श्रद्धांजली.