महाराष्ट्र

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

शाहूवाडी (डी. एस. नांगरे) शित्तूर – वारुण ( तालुका – शाहूवाडी ) येथे शित्तूर पैकी पाटिलवाडी येथील शेतकऱ्यावर रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील शेतकरी सर्जेराव पांडुरंग पाटील (वय ५३ वर्ष) हे आपल्या मक्याच्या शेतात फेरफटका मारण्यासाठी लहान नातीसोबत गेले असता अचानक पिकातून येऊन बेसावध असताना पाठीमागच्या बाजूनं हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कधी शेळी, कधी म्हैस आणि आता माणूस!

बिबट्याची दहशत असताना आता पुन्हा एकदा रानगव्याच्या उपद्रवामुळे परिसरातील लोक पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वेळा वर्तमाणपत्र आणि मीडियामधून बातम्या प्रसिद्ध होऊनही वनविभाग या उपद्रवी जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्यात उदासीन आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे